शेवगाव : 'साप चावला, की मृत्यू हा निश्चितच', असा गैरसमज समाजात असल्याने सर्प म्हटल्यावर चक्क अंगावर शहारे येतात. त्यामुळे साप दिसला की तो मारण्यासाठी खूप जण पुढाकार् घेतात. परंतु त्यांना वाचवण्याचे काम कोणी करत असेल तर ते फक्त सर्पमित्रच.
सर्पमित्र 'आकाश जाधव' या नावाने यू ट्यूब चॅनल चालू केले आणि त्या माध्यमातून वीडियो काढून सापांबाबतची माहिती देण्यास सुरुवात केली. या माध्यमातून ते देशभर पोहोचले. सापांविषयी असलेले गैरसमज दूर करून सर्प हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे, हे निदर्शनास आणून दिले. त्यांच्या या कार्याला त्यांच्या कठीण परिश्रमानंतर अखेर यश संपादन झाले. आकाश जाधव यांच्या या चॅनल ला तब्बल चाळीस लाख फॉलोअर्स झाले जे की खूप कठीण गोष्ट आहे. याबद्दल त्यांचा सन्मान अहमदनगर येथील नागरदेवळे या गावी करण्यात आला. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व विधानसभा सदस्य संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, सर्पमित्रांचा सन्मान होणारा हा पाहिलाच कार्यक्रम असेल. आकाश जाधव यांनी लवकरच एक करोड़ लोक जोडावे व खूप प्रगती करावी अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. तसेच भविष्यात सर्पमित्रांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल, असे आश्वासन माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या सूर्पमित्रांचा सन्मान करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना बालताना आकाश जाधव यांनी आपल्या यशाचे श्रेय देशातील सर्व सर्पमित्र तसेच गावकरी याना दिले.
कार्यक्रमाला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम भैया जगताप, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सर्पमित्र, सर्पमेत्रिणी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ति, शेवगाव तालुक्यातील सर्पमित्र श्रीनाथ बैरागी, सर्पमित्र संतोष लाकडे, सर्पमित्र रितेश हुशार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भीमराज युवा प्रतिष्ठान तथा पँथर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले.