ऊसाचा गडबड-गोंधळ : दोष वजन काट्यात, मनस्ताप मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना

कारखान्यांची मनमानी न थांबवल्यास शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार : सनी देशमुख

शेवगाव : ऊसाचे कारखान्याच्या वजन काट्यावर आणि बाहेरील खाजगी वजन काट्यावर वजन केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कारखान्यांकडून दुजाभाव केला जात असल्या कारणाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कारखान्याच्या विरोधात कमालीचा संताप पसरलेला आहे. तसेच कारखान्यावरील काट्यावरच उसाचे वजन करण्याची सक्ती केली जात आहे. 

हा अन्यायकारक प्रकार त्वरित न थांबवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजीब्रिगेडचे माजी शेवगाव शहर अध्यक्ष सनी देशमुख यांच्यासह पीडित ऊसउत्पादक शेतकऱयांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील संघर्ष वाढणार असे चित्र दिसून येत आहे.

शेवगाव तालुका मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक तालुका म्हणून ओखला जातो. तालुक्याला लागून चार साखर कारखाने आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याकडे ऊस टाकावा यासाठी त्यांच्यात चढाओढ चालू असते. सध्या ऊस तोडणी व गाळपाचे दिवस चालू आहेत. त्यामुळे कारखान्यावर उसाच्या गाड्यांची रीघ लागलेली दिसते.

शेतकऱयांनी कारखान्यावरील वजन काट्यावरच ऊसाचे वजन करावे, यासाठी कारखाना प्रशासन दबाव टाकत असल्याचे दिसते. मात्र, कारखान्यावरील वजन काट्यावर वजन केल्यास उसाचे वजन कमी भरते, असा आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. 

तथापि, बाहेरील खासगी वजन काट्यावर वजन केलेल्या शेतकऱयांचा ऊस चार ते सहा दिवस विलंबाने घेतला जातो. परिणामी शेतकर्याना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या उलट कारखान्याच्या वजन काट्यावर वजन केल्यास त्या शेतकऱ्यांचा ऊस लगेच घेतला जातो. या दुजाभावामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. 

दरम्यान, बाहेरून वजन केलेला ऊस कारखान्याने लवकर घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे. कारखान्यांनी आपल्या धोरणात बदल न केल्यास या अन्याया विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

यावर कारखाना प्रशासन काय निर्णय घेते हे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यावरच पुढील काळातील शेतकरी आणि कारखाना यांच्यातील संबंध कसे राहतील हे ठरणार आहे. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !