आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बजावली नोटीस!

पिंपरी चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचा वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा श्री श्री रविशंकर यांच्याकडे पिंपरी चिंचवड पोलिसांनी खुलासा मागितला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी या प्रकरणी श्री. श्री. रविशंकर यांना नोटीस बजावली आहे.

स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन करत असून, यामध्ये संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. 

काळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना देखील निवेदने देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !