'शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम लढा देऊ'

प्रा. शिवाजीराव काटे यांचे प्रतिपादन

शेवगाव  : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम लढा देत राहू, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सचिव प्रा. शिवाजीराव काटे यांनी गंगामाई साखर कारखाना येथे केले.

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गंगामाई साखर कारखाना प्रशासनासोबत शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सचिव प्रा. शिवाजीराव काटे सर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

डिझेल, पेट्रोल,गॅस,वाढती वीजबिले या वाढत्या महागाईच्या भस्मासुराच्या ओझ्याखाली शेतकरी ,सर्वसामान्य माणूस,चाकरमानी अगोदरच दबलेला असताने शेतकऱ्यांची ठरवून लुबाडणूक करणाऱ्या ठेकेदार व त्यांचे साथीदार यांच्यावर प्रशासनाने कडक  कारवाई करावी ही भूमिका यावेळी मांडण्यात आली.

तालुक्यातील गटांमधील शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्य देऊन गटात ऊस तोडणी यंत्रणा वाढवण्यासाठी व ऊसतोड ठेकेदार व  मजूरांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी कारखाना प्रशासनासोबत बैठक घेण्यात आली व त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी गंगामाई इंडस्ट्रीज अँड कंस्ट्रक्शन लिमिटेड, हरिनगर चे व्हाईस प्रेसिडेंट मा. खेडेकर साहेब यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले. तसेच कृषी अधिकारी कचरे साहेब यांनीही ऊस तोड मजूरांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीबाबत योग्य ती पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले.

काँग्रेस कमिटीतर्फे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे व शेतकऱ्यांची  होणारी मानसिक,आर्थिक,सामाजिक  पिळवणूकी विरोधात पक्ष सक्रीय भूमिका घेणार आहे असे कमिटीतर्फे सांगण्यात आले. 

कृषी अधिकारी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना असे आवाहन केले आहे, की "ऊसतोड मजुरांनी आपल्याला पैशांची मागणी केली असल्यास अथवा पैसे घेतल्यास त्याची रीतसर तक्रार कारखाना प्रशासनाकडे करा, आपल्याला आपण दिलेला पूर्ण पैशाचा परतावा संबंधित ठेकेदाराच्या रकमेतून दिला जाईल.

कारखाना प्रशासनातर्फे काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांना गंगामाई सॅनिटायझर बॉटल देण्यात आल्या.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके, जिल्हा काँग्रेसचे सचिव प्रा. शिवाजीराव काटे सर, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बब्रु वडघने, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, युवक काँग्रेसचे पदाधिकारी सचिन काळे आदी काँग्रेसचे कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !