अहमदनगर - साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती बाबत 'मोठाा' निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा न्यायालयाने निकालात म्हटले आहे. त्यांच्या नियुक्तीच्या विविरोधात शिर्डी येथील उत्तम शेळके यांनी याचिका दाखल केली होती.
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या विरोधातील उत्तम शेळके यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला.
न्यायालयाने कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचे सागंत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. बगाटे हे आयएएस ऑफिसर नसूनसुद्धा राज्य सरकारने त्यांना शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती दिलीच कशी अशी विचारणा केली आहे.
न्यायालयाच्या निकालामुळे बगाटे अडचणीत सापडले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बगाटे यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यानंतर शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नेमणूक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.