शिंगोरीच्या 'त्या' युवकांनी घडविले मानवतेचे दर्शन

शेवगाव : रेल्वे अपघातामुळे तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या गावच्या जावयासाठी मदतीला धावून आलेल्या शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील युवकांनी आपल्या या कृतीतून मानवतेचे दर्शन घडवून आणले आहे. 

जगातून मानवता हरवत चालल्याचे दिसून येत असतानाच शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावातील  'शृंगऋषी' या सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या युवकांनी एक अनोखे काम करून मानवता अद्याप जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. 

कोरोना काळात सर्वत्र मोठ्याप्रमाणात आर्थिक संकटाना तोंड देत देश पुढे सरसावत आहे. या परिस्थितीतही कोणी आर्थिक अडचणीत असताना त्याला मदत करण्याची दांत दाखविणे ही माणसातील माणूसपण उंचावणारी घटना आहे. 

गावातील एक मुलगी मुंबई मध्ये पतीसह राहते. तिच्या पतीचा रेल्वेतून उतरत असताना अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे तत्काळ उपचारासाठी आणि शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागणार होता. अचानक हा पैसा उभे करणे अडचणीचे होते. 

याबाबत येथील युवकांना माहिती मिळाली. यंत्र त्यांनी प्रतिष्ठान च्या माध्यमातून मदतीची मागणी केली. त्यास प्रतिष्ठानने प्रतिसाद देत अवघ्या दोन दिवसात मदतीसाठी मोठी रक्कम जमा करून दिली. ऐनवेळी वैद्यकीय उपचार करण्यासाठी झालेल्या मदतीने संबंधित कुटूंबाला मोठा दिलासा मिळाला. 

अशा प्रकारे आपल्या गावातील बहिणीच्या मदतीसाठी धावून आलेल्या सर्व मित्रांचे प्रतिष्ठान च्या वतीने खुप खुप आभार व्यक्त करण्यात आले. बदल घडतोय फक्त बदल घडवणारा हवा आहे ही गोष्ट या निमित्ताने पुढे आली आहे. 

समाजकारणातून समाजपरिवर्तन हे ब्रीद समोर ठेऊन कंकरणार्या प्रतिष्ठानच्या या समाजभिमुख कार्याला सलाम.


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !