कोविड-19 लसीकरणाबाबत 'शिक्षक भारती'ने केली 'ही' मागणी

शेवगाव : तालुक्यातील शिक्षकांची कोरोणा लसीकरण व्हावे या मागणीसाठी तालुका शिक्षक भारती संघटनेच्या वतीने तालुका आरोग्याधिकारी डॉ. सलमा हिरानी यांना निवेदन देण्यात आले. 

शिक्षक भरती संघटने च्या वतीने कोवीड १९ चे नियम पाळूण संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव व उपाध्यक्ष नानासाहेब काटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद अंचवले , बाळासाहेब उभेदळ, अर्जुन घुगे, पांडुरंग व्यवहारे, विलास फुंदे. राजेंद्र शिंपी, बबनराव गायकवाड आदी शिक्षकांनी निवेदन दिले.

याबरोबरच शासन स्तरावर विविध अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिक्षक लसीकरणाची मागणी शिक्षक भरतीच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामध्ये शेवगावचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, यांचा समावेश आहे. 

आरोग्य अधिकाऱ्यांचे आश्वासन 

शेवगाव तालुका आरोग्य अधिकारी हिराणी मॅडम यांनी शिक्षक भरतीच्या मागणीची दखल घेऊन येत्या दोन दिवसात शिक्षकांना कोवीड लस देण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !