समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन : प्रभाग ९ मधील नागरिकांचा इशारा

सातपूर : महापालिका हद्दीतील प्रभाग ९ मधील शिवाजीनगर, श्रमिक नगर, धर्माजी कॉलनी, धृवनगर व मळे परिसरातील समस्या सोडविण्याची मागणी महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे सविता गायकर यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी केली. समस्यांची सोडवणूक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला आहे. 

नाशिक महापालिका  प्रभाग क्रमांक ९ मध्ये नागरिकांच्या सुख सुविधांची कामे  होणे आवश्यक होते. परंतु नागरिकांची मागणी लक्षात घेता योग्य ती कामे या प्रभागामध्ये झालेली नाहीत. कुठेतरी चार ते पाच कामे वगळता उलट प्रभागात समस्यांचे डोंगर उभे राहिले आहेत. प्रभागामध्ये एकही काम समाधानकारक झालेले नसल्याने नागरिक अत्यंत त्रस्त आहेत. 

मोकाट जनावरांचा उच्छाद 

प्रभागातील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडेझुडूपे वाढली असून त्यावर कचरा घाणीचे साम्राज्य झाले आहे. यामुळे मोकाट कुत्रे व जनावरे खूप मोठ्या प्रमाणात तेथे जमा होत असून अनेक लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी जखमी केले आहे त्यासाठी आपण तात्काळ मोकाट कुत्रे पकडण्यासाठी कार्यवाही करावी.

उद्याने होतायेत भकास

प्रभागातील उद्याने ग्रीन जिम त्यामधील साहित्य खराब होऊन उद्याने भकास होत चालली आहेत. त्याची निगा राखण्यासाठी आपल्या महापालिकेतील कर्मचारी असमर्थ ठरत आहेत. उद्याने व ग्रीन जिम यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.

रस्त्यांची दुरावस्था

प्रभागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून फक्त तात्पुरता स्वरूपाची डागडुजी केली जात आहे सदर कामे देखील अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे केले जात आहे त्याची  संपूर्ण माहिती घेऊन आपल्या स्तरावर हे कामे चांगल्या दर्जाचे करावी ही विनंती. तसेच प्रभागातील कामे पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात यावी. जे रस्ते मंजूर झाले आहेत ते झाले की नाही याचीही तपासणी करावी. यात जर काही चूक असेल तर  दोषीवर कडक कारवाई करावी, मुख्यतः मळे परिसरातील रस्त्यांकडे ही लक्ष द्यावे.

कार्बन नाक्यावरील भाजी बाजार अधिकृत करा

प्रभागातील कार्बन नाका येथे असलेल्या भाजी बाजाराला अधिकृत मंजुरी द्यावी व त्या ठिकाणी मोठे स्ट्रीट लाईट उभे करावेत. योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच स्वतंत्र जागेमध्ये मटन मार्केट ची सुद्धा उभारणी करावी वेगवेगळ्या ठिकाणी हॉकर्स झोन तयार करून हॉकर्सची नोंदणी महानगरपालिकेकडे करावी व लहान-मोठे उद्योग करणाऱ्या व्यवसायिकांना व्यवसाय व्यापार करण्यासाठी चालना द्यावी.

अवजड वाहनाचा त्रास

प्रभागाला लागून मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथे रोज हजारो कामगार कामासाठी जात येत असतात. तेव्हा कामाला जाण्याच्या व येण्याच्या वेळेत अवजड  वाहनांस प्रवेश बंदी करावी व अपघात टाळावे.

छत्रपती शिवाजी महाराज शाळा खुली करा 

प्रभागातील महापालिकेच्या निधीतून नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शाळेचे कोरोना पार्श्वभूमीवर ई-उदघाटन आपल्या व महापौरांच्या हस्ते करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट मोकळी करावी. अन्यथा प्रभागातील नागरिकांच्या वतीने हे उद्घाटन आम्हाला करावे लागेल याची नोंद घ्यावी.

स्ट्रीट लाईट बंद

प्रभागामध्ये अनेक स्ट्रीट लाईट हे बंद स्वरूपात असून त्याची तात्काळ दुरुस्ती करून चालू करावेत.

विद्युत तारा बनल्या धोकादायक

अनेक ठिकाणी विद्युततारा, विद्युत वाहिनी पोल हे नादुरुस्त आहेत, तरी ते तात्काळ अंडरग्राउंड करून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी.

पाण्याची वेळ बदला

प्रभागातील घरगुती वापरासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याची वेळ बदलण्यात यावी. या सर्व समस्यांची सोडवणूक व्हावे अन्यथा सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना व नागरिक यांच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभे केले जाईल. 

यावेळी सविता गायकर, सदाशिव माळी, दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, महेश आहेर, एमडी शिंदे, सम्राट सिंग, नवनाथ शिंदे, सचिन निकम, मनीषा गांगुर्डे, संगीता उबाळे, कल्पना बैरागी, प्रियंका गायकर आदी उपस्थित होते. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !