इन्स्पेक्टर सचिन वाझेंची १२ तास चौकशी व अटक, वाझेंनीच 'तो' प्रकार केल्याचा संशय

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या कार प्रकरणाला पुन्हा वेगळे वळण लागले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी मध्यरात्री ११.३० च्या सुमारास वादग्रस्त पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणात १२ तास कसून चाैकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

कार्मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यात सचिन वाझे यांची भूमिका आणि सक्रिय सहभाग असल्याच्या संशयावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास वाझे करत होते, त्याच प्रकरणात त्यांना अटक झाली आहे.

व्यापारी मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी वाझेंविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे सापडले आहेत, असे निरीक्षण नोंदवून ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तर एनआयएच्या मुंबई कार्यालयात वाझेंनी जबाब नोंदवला होता. अँटिलिया स्फोटकांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिहार तुरुंगात चौकशी केली आहे.

दि. २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी सचिन वाझे आणि मृत मनसुख सोबत होते, हिरेन यांच्या पत्नीने फिर्यादीत थेट वाझेंवर आरोप केला आहे. याप्रकरणी तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.

'मला' अडकवण्याचा प्रयत्न

अटक होण्यापूर्वी वाझे यांनी सोशल मिडियावर ‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. कारण पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. आधी मला १७ वर्षे संयम, आयुष्य आणि नोकरी यांची आशा होती. आता १७ वर्षांचे आयुष्य आहे ना नोकरी, ना संयम’ असे स्टेटस ठेवले होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !