रोलेट लॉटरी उध्वस्त करणारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे कौतुक

नाशिक : रोलेट सारख्या महाभयंकर ऑनलाइन लॉटरीविरुद्ध धडाकेबाज कारवाई करणारे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिनजी पाटील यांच्या कामगिरीचे कौतुक छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने सत्कार करून करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोलेट सारख्या महाभयंकर ऑनलाइन लॉटरी सारख्या गोरकधंद्याच्या साखळीचा मुळासकट झालेला आहे. सर्वसामान्य माणूस यामध्ये होरपळून जातो आणि आर्थिक अडचणीत सापडतो. अशा या दुष्टचक्राचा नायनाट करण्याचे काम सचिन पाटील यांच्या द्वारे सुरू आहे. 

अनेक कुटूंब बरबाद होण्यापासून वाचविण्याचे काम ते करत आहेत.  त्याच बरोबर कोरोना महामारीच्या संकटात नाशिक ग्रामीण मध्ये आपल्या शांत, संयमी व शिस्तप्रिय स्वभावाने एक आगळी वेगळी छाप निर्माण करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखलेली आहे. 

पाटील यांच्या या कार्याबद्दल  छावा क्रांतीवीर सेना, महाराष्ट्र च्या वतीने पर्यावरण संवर्धन जनजागृती निमित्ताने रोपटे, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष करण गायकर, विद्यार्थी सेना प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे, नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे, शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !