खळबळजनक | महसुलचा बनावट दस्त घोटाळा, 'यांच्या'विरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर - महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात उघड झालेल्या महसूल खात्यातील बनावट दस्त घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


बनावट लेटरहेडचा वापर करून त्यावर बनावट सही शिक्का मारून महाराष्ट्र बँकेच्या सावेडी शाखेची ५ कोटी १ लाख ८४ हजार ६१४ रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

या प्रकरणी मंडळ अधिकारी, तलाठ्यासह ७ जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मवाळ इन्फ्रास्ट्रक्चर ऍग्रो आर अॅण्ड डी सेंटर अँण्ड सोलुशनचे भागीदार अशोक मदनलाल मवाळ, पंकज अशोक मवाळ, भरत अशोक मवाळ, मृदुल अशोक मवाळ (सर्व रा. भिस्तबाग, नगर), मंडलाधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ धसाळ, सावेडीचे तलाठी हरिचंद्र विजय देशपांडे, नागापुरचे तलाठी संदीप किसन तरटे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

चौकशीत होतील गंभीर बाबी उघड...

बदली झाल्यावर कर्मचारी तालुक्यातील तहसील मधील घोटाळे केलेल्या प्रकरणाच्या फाईल जाळून नष्ट करतात. त्यामुळे आजही सर्वसामान्य माणसाची कामे होत नाहीत. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली तर गंभीर बाबी उघड होतील. आजही सर्व तहसील कार्यालय महसूल शाखेतील जमीन, कुळकायदाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत बसून असतात.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !