रेखा जरे हत्याकांड : विशेष सरकारी वकील म्हणून नावाजलेल्या 'या' वकिलांची नियुक्ती

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाच्या खटल्यात मुंबईतील खात्यानाम वकील उमेशचंद्र यादव पाटील यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश बुधवारी (९ मार्च) महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केले आहेत. नगरमधील जवखेडे पाहून खटल्याचे काम ऍड. पाटील पहात आहेत. 

ऍड. पाटील यांच्या रूपाने सक्षम, अभ्यासू वकील रेखा जरे खून खटल्यास मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आरोपीना शासन होईलच, असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारातील घाटात ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली होती. या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. 

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे, उत्तम भिंगारदिवे व ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार यांना कोल्हापूरमधून अटक केली होती. या खुनाचा मास्टरमाइंड पत्रकार बाळ बोठे असल्याची कबुली आरोपी भिंगारदिवे याने पोलीस तपासात दिली. 

यानंतर पसार झालेल्या बोठे याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान पारनेर न्यायालयाने आरोपी बोठेला फरारी घोषित केले आहे. 

नगरमध्ये या खटल्यात पाहिले काम 

प्रसिद्ध फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी नगर जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण खटल्यात काम पाहिले आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरण, कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरण, पाथर्डी तालुक्यतील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांड, जामखेडमधील दुहेरी खून प्रकरण अशा गाजलेल्या आणि महत्वपूर्ण खटल्यांचा सामवेश आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !