रेखा जरे हत्याकांड ! कोठडीतील बोठेची चौकशी सुरु; आरोपींची संख्या वाढणार

अहमदनगर : यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार बाळ बोठे याच्या सध्या सुरु असलेल्या पोलीस तपासात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता असून आरोपींची संख्या वाढू शकते. 

या हत्याकांडात आणि फरार होण्यात बोठे ला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारांची वर्णी या गुन्ह्यातील आरोपींच्या रांगेत लागणार आहेत. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

न्यायालयाने २० मार्च पर्यंत बोठे ला पोलीस कोठडी दिली आहे. त्यातील काल पहिल्या दिवशी रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून त्याची चौकशी करण्यात आल्याचे समजते. तपासात पोलिसांना बोठेकडून अनेक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. 

पोलिसांना या प्रश्नांची हवीत उत्तरे - 

  • बोठे याने रेखा जरे यांची हत्या का केली
  • त्यासाठी कुठलं असं नाजूक कारण घडले होते. 
  • हत्या करण्याचा डाव  कधी, कुठे आणि कसा रचला
  • यात कोण कोण सामील आहे
  • घटनेनंतर बोठे कसा फरार झाला
  • फरार होण्यासाठी त्याला कोणी, कशी मदत केली, 
  • फरार असताना १०२ दिवसांमध्ये तो कोणत्या कोणत्या गावाला आणि ठिकाणी राहिला, 
  • याठिकाणी राहण्यासाठी त्याला कोणी मदत केली, 
  • अहमदनगर ते हैद्राबाद त्याचा प्रवासाचा मार्ग कसा होता, 
  • हैद्राबादचे ठिकाण त्याने कसे निश्चित केले, 
  • त्यासाठी कुठल्या ह्ष्टीने मदत केली, 
  • हैद्राबाद मध्ये वापरत असलेला 'तो' मोबाईल नेमका कुणाचा होता, 
  • फरार असताना अहमदनगरमधुन त्याला कोणी कोणी माहिती दिली, 
  • आर्थिक रसद पुरवली 
  • अशा अनेक प्रश्नांची उकल पोलीस तपासात होणार आहे. 
  • त्यामुळे खुणा सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारांची नावे या गुन्ह्यात पुढे येणार आहेत.

३० नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुप्याजवळील (अहमदनगर) घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या नंतर पोलिसांनी पाच आरोपीना काही काळातच ताब्यात घेतले होते. 

या हत्याकांडाच्या मुख्य सूत्रधार तेंव्हापासून फरार होता. शनिवारी पहाटे फैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात आले. यानंतर रविवारी त्याला पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !