सांगली - नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्या बाबत आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. सांगलीत एका कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेवेळी आठवले म्हणाले, कोरोना बाधितांची संख्या सर्वत्र वाढत असून देशातील १० जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.
देशातील दहा पैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील असल्यामुळे राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने लक्ष द्यावे. लोकांनीही शासनाने सांगितलेल्या प्रत्येक नियमांचे पालन करावे, अनावश्यक गर्दी टाळावी, लग्न आणि इतर कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात सध्या कोरोनाची आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी का? त्याबद्दल विचार करावा लागेल. असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.