शंभर महिलांनी अनुभवला 'रॅपलिंग'चा थरार

अहमदनगर - मार्च महिना उजाडला की वेध लागतात महिला दिनाचे. महिलेला सर्वशक्तिस्वरूप मानणाऱ्या आपल्या संस्कृतीला अनुसरून 'ट्रेककॅम्प डिस्कव्हर अननोन' आणि 'जीवाशी ट्रेकर्स'ने नुकतेच 'वुमन्स डे रॅप्लिफाईड' या उपक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने महिलांनी उंच कड्यावरून दोराच्या सह्याय्याने खाली येण्याचा थरार अनुभवला.

हे असं साहस करण्यासाठी तज्नांचे सहकार्य आणि मनाची भक्कम तयारी लागते. हीच मनाची तयारी करून १०० महिलांनी मांजरसुम्भा गडावर चढाई केली. भीतीवर मात करत आयुष्याची मजा अनुभवत सर्व वयोगटातील महिलांनी हा अनुभव घेतला. 

एक स्त्री जेव्हा सर्व बाजूने सक्षम होते आणि आपल्या स्वप्नांना साद देते तेव्हा सर्व कुटुंबियांना एका सुदंर आयुष्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन ट्रेककॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांनी केले.

या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी आनंददायक तसेच स्फूर्तिदायक आहे. अशा पद्धतीच्या मोहिमांसाठी आम्ही नेहमीच उत्सुक आहोत, अशा शब्दात जीवाशी ट्रेकर्सच्या वैभव चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

92 70 251 878 हा मोबाईल क्रमांक तुमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट करा आणि मिळवा ताज्या बातम्या

तसेच प्रथमच हा अनुभव घेत रॅपलिंग करून मांजरसुंभा गड चढणाऱ्या महिलांनी देखील या उपक्रमाच्या आयोजनबद्दल आभार व्यक्त केले. यानंतरही असे साहसी उपक्रम आयोजित केले जातील, असे विशाल लाहोटी यांनी सांगितले.


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !