तुम्ही लोकांना नवजीवन दिले, तुमच्या कार्याला सलाम

अहमदनगरकोरोना महामारीच्या संकटकाळात कोरोना रुग्णांसाठी आधार ठरलेल्या व निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करणार्‍या सॅलेवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटल मधील महिला डॉक्टर व परिचारिकांचा जागतिक महिला दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता महामारीच्या काळात कोरोना रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य केल्याबद्दल हॉस्पिटलमधील महिलांच्या कार्याला सलाम करण्यात आले.  

डॉ. सिमरन वधवा यांच्या अध्यक्षतेखाली बुथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, मेजर ज्योती कळकुंबे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, स्वच्छता दूत शारदा होशिंग आदींसह डॉक्टर, परिचारिका व हॉस्पिटलच्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

बुथ हॉस्पिटलच्या कॅप्टन जयमाला साळवे, डॉ. मीना फुके, डॉ. चैतन्या मंडलिक, डॉ. अलिशा मंडलिक, सिस्टर सत्वशीला वाघमारे, लता वाघमारे, सुनिता पारखे, मीना दौंडे, कल्पना साळवे, विद्या साळवे, महिमा पारखे, संजीवनी भोंगाळे, निर्मला कंदारे, विमल जाधव, अश्‍विनी बोधक, सिमरन घोडके, प्रेरणा वाघमारे, शालिनी कसबे, सपना चौहान, मारिया सोनवणे, नजमा आरिफ, शोभा जावळे यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते हॅट, फ्लॉवर पॉट व पेन देऊन सन्मान करण्यात आला.

मेजर ज्योती कळकुंबे म्हणाल्या की, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व पुर्ण करण्यासाठी बुथ हॉस्पिटलने कोरोनाच्या महामारीत मानवसेवेचे निस्वार्थ भावनेने कार्य केले. मनुष्यबळ व भौतिक सोयी-सुविधा कमी असून देखील मोठ्या जिद्दीने व कष्टाने हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर व कर्मचार्‍यांनी कोरोना रुग्णांचे जीव वाचविले. ज्येष्ठ परिचारिकांनी देखील दिलेली जबाबदारी स्वखुशीने सांभाळून कार्य केले. महामारीत आरोग्यसेवा देत असताना कुटूंबापासून लांब राहून महिलांनी मोठा त्याग दिला. 

आरोग्यसेवा देणार्‍या महिलांचा अफाट आत्मविश्‍वास व इच्छाशक्तीने कोरोनाशी लढता आल्याचे त्यांनी सांगितले. मेजर देवदान कळकुंबे यांनी स्त्री ही एक शक्ती असून, अनेक भूमिका बजावून आपली जबाबदारी पार पाडत असते. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. इवॅन्जलीन बुथ हॉस्पिटल हे एका महिलेच्या नावानेच असल्याचे अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. कोरोना प्रतिबंधात्मकतेचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा होशिंग यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !