एक व्हायरस अदृश्य..
डोळ्यांना न दिसणारा..
साऱ्या जगात धुमाकूळ घालतोय..
भेडसावून सोडतोय...
तो दिसत तर नाही,
पण...
मानवजातीला मरणाच्या भीतीच्या खाईत नेतोय..
रोज आनंदात,
आपल्या धुंदीत जगणाऱ्या माणसांच्या
साऱ्या सुखाच्या व्याख्या गळून पडल्या आहेत..
तो आता जीवनाच्या,
जगण्याच्या तत्वज्ञानाच्या गप्पा मारत सुटलाय..
एक व्हायरस..
दिसत तर नाही,
पण जिवाच्या आकांताने पळत सुटली सारी...
ह्याला जबाबदार कोण?
आपणच ना..?
पर्यावरणाची हानी,
निसर्गाचा ऱ्हास..
मस्ती, निसर्गाची हानी
बेताल, बिनधास्त, बेइमानी, फसवणूक..
स्पर्धा..
मीच साऱ्यात पुढें ही इर्षा..
भेसळ, अत्याचार...
अत्याधुनिक जगाची घमेंड...
स्वैराचार...
स्वार्थ..
सारं सारं..
तूम्ही आम्हीच करीत सुटलो ना..
कुठे गेलं प्रेम..
कुठे गेली मदतीची भावना...
कशाला हवा इतका पैसा..
पैश्यासाठी माणसे ही मारायला निघालोय आपण...
नात्यांना तिलांजली...
निसर्ग कसा सहन करेल तुमचा अहंकार..
लागले की नाही पळायला..
फक्त एक व्हायरस..
हो ना...
अन् उद्या चार व्हायरस निर्माण झाले तर..
आख्खी मानवजात संपेल त्यावेळी...
आपणं पाहुणे आहोत या पृथ्वीचे...
त्या प्रमाणे वागा..
आपणं कधी मरणारच नाहीत...
ही तर आपली मस्ती..
बस करा,
शहाणे व्हा, मान खाली करा,
माफी मागा...
होइल सारं व्यवस्थित..
थोडं खाली या....
एवढंच...
एक व्हायरस आहे आत्ता..
उद्या चार तयार झाले तर...?
- जयंत येलुलकर (अहमदनगर)