धक्कादायक ! व्हॉट्स अँपवर नाव पत्ता पाठवा, आणि बनावट सरकारी कागदपत्रे मिळवा..

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली टोळी जेरबंद

पिंपरी-चिंचवड :  बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जेरबंद केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने काळेवाडीतील आशीर्वाद कॅफेवर छापा टाकून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. आशीर्वाद कॅफेचा मालक राहुल गौड हा त्याच्या इतर पाच साथीदारांसह बनावट कागद पत्र तयार करत होता. या टोळीने आतापर्यंत आठशे लोकांना बनावट कागदपत्रे बनवून दिल्याची माहितीही पोलिसांनी दिली.  

याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांच्या पथकाने केली.

हे आरोपी ताब्यात

राहुल गौड (वय 33, रा. रुपीनगर, निगडी), बालाजी गोरख बाबर (वय 23, रा. संदीपनगर, थेरगांव), तुकाराम अर्जुन मगर (वय 30, रा. गजानन नगर, काळेवाडी फाटा), प्रवीण दशरथ दळवे (वय 25, रा. राशे फाटा, चाकण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. 

हे साहित्य केलं जप्त

आरोपींकडून 1 लाख 21 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल, बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य, प्रिंटर, पेन ड्राइव्ह, झेरॉक्स मशीन यासह काही सर्टिफिकेट, एक मोबाईल आणि रबरी स्टॅम्प असं साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या कागदपत्रांचा समावेश

यात, आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्रे संगणकावर बनवली जात होती. 

अशी बनायची कागदपत्रे

आरोपी राहुल ज्या व्यक्तीला बनावट कागदपत्रे बनवून घ्यायची आहेत त्यांच्याशी संपर्क करुन व्हाट्सऍपवर नाव आणि पत्ता घ्यायचा. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून दिली जायची. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !