मोदी सरकारचा मोठा खुलासा : पेट्रोल, डिझेलमागे चक्क 'एव्हढी घसघशीत' कमाई

नवी दिल्ली : केंद्र सरकार इंधनविक्रीमधून मोठ्या प्रमाणात महसूल कमवत असल्याचा मोठा खुलासा खुद्द मोदी सरकारनेच केला असून हि आकडेवारी सर्वसामान्यांना अक्षरशः भोवळ आणणारी आहे. अबकारी कर, उपकर आणि अधिभार या माध्यमातून इंधनविक्रीमधून केंद्राच्या तिजोरीत घसघशीत कमाई होत असल्याची कबुली सरकारने दिली आहे


पेट्रोलमागे २३ रुपये तर डिझेलमागे १९ रुपये महसूल

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ६ मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये तर प्रति लिटर डिझेल मागे ३२ रुपये  केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत आहेत. ही कमाईची आकडेवारी अबकारी कर, उपकर आणि अधिभार या तिन्ही गोष्टी मिळून आहे. २०२० साली मार्च आणि मे महिन्यादरम्यानच्या दरांशी तुलना केल्यास या कालावधीमध्ये केंद्र सरकारला प्रति लिटर पेट्रोलमागे २३ रुपये तर डिझेलमागे १९ रुपये महसूल म्हणून मिळत होते.

कमाई वाढली... 

१ जानेवारी २०२० ते १३ मार्च २०२० दरम्यान केंद्र सरकार प्रति लिटर पेट्रोल मागे २० रुपये तर प्रति लिटर डिझेल मागे १६ रुपये महसूल कमावायचे. म्हणजेच १ जानेवारी २०२० च्या आकडेवारीशी तुलना केल्यास सध्या मोदी सरकारची प्रति लिटर पेट्रोल मागील कमाई १३ रुपयांनी तर प्रति लिटर डिझेल मागील कमाई १६ रुपयांनी वाढली आहे.

निवडणुकीनंतर पाच राज्यात इंधन भडका 

इंधनावर मोदी सरकारकडून जास्त कर आकारला जात आहे, त्यामुळे होणाऱ्या इंधनदरवाढीवरुन सरकारवर विरोधी पक्षांनी धारेवर धरले आहे. तसेच पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्राने तेथील किंमती वाढू दिल्या नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे निवडणुकानंतर या राज्यांमध्ये इंधनदरवाढीचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अर्थमंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेमध्ये इंधनदरवाढीसंदर्भात बोलताना, इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशामध्ये पेट्रोलीयम पदार्थांचे दर कमी किंवा अधिक असतात यामागे अनेक कारणे असल्याचे सांगितले. 

सध्या असणारी कर रचना, प्रत्येक सरकारकडून देण्यात येणारी सबसीडी यासारख्या गोष्टींबरोबरच सरकारने नमूद न केलेल्या इतर गोष्टींचाही या दरांवर परिणाम होतो, असे स्पष्ट केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील किंमतीप्रमाणे देशातील किंमती ठरत असतात, असेही सांगण्यात येत आहे.

इंधनाचे दर अधिक असल्याचे समर्थन

ठाकूर यांनी इंधनाचे दर अधिक असल्याचे समर्थन करताना, केंद्र सरकारला सध्याची वित्तीय तूट पाहता अबकारी कराच्या माध्यमातून बांधकाम आणि इतर विकास कामांसाठी निधी उभारण्यासाठी मदत होत, असल्याचे मत नोंदवले होते. पण असे असले तरी जागतिक बाजारपेठेवर देशातील इंधानाचे दर ठरत असले तरी इंधनाचे दर मागील दोन आठवड्यांपासून नियंत्रित कसे आहेत, यासंदर्भात सरकारकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याचे 'इंडिया टुडे'ने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने इंधन आणि पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या अंतर्गत आणण्याचा कोणताही विचार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !