पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ! पण असे...

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक पुरते वैतागले असून त्यामुळे सरकारविरोधात संताप वाढत आहे. इंधन दर वाढीचा हा पेच सोडवायचा कसा, असा प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामण, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यासह पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पडला होता. 

मागील महिन्यात तब्बल चौदा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. यानंतर जवळपास सगळ्याच शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.  मात्र आज सलग विसाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

तब्बल 25 रुपयांची येईल घट

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावर एक पर्यायही सुचवला आहे. पेट्रोलियम प्रोडक्ट्स जीएसटीमध्ये आणायला हवे आणि याबद्दल GST काउन्सिलमध्ये चर्चा व्हायला हवी, अशी त्यांची भूमिका आहे. जीएसटी मध्ये आल्यास पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये तब्बल 25 रुपयांची घट येईल, असे त्यांनी म्हटले होते. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याआधीच केली होती मागणी

जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेलला आणण्याची मागणी सरकारने केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांना याचा फायदा होईल. याशिवाय दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन विधानसभेत म्हणाले, की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधीच पेट्रोल - डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे.

कसे बदलतात दर

रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये बदल होत असतात. सकाळी ६ वाजतापासूनच नवीन दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडून किंमत जवळपास दुप्पट होते. विदेशी चलनासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतात.

'एसएमएस'द्वारे मिळवा दराची माहिती 

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तुम्ही SMS च्या माध्यमातून तपासू शकता. इंडियन ऑईल वेबसाईटनुसार, तुम्हाला RSP सह आपल्या शहराचा कोड टाईप करून 9224992249 या नंबरवर SMS पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. हा आपण IOCLच्या वेबसाईटवर पाहू शकता. 

तर BPCL ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि HPCL ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !