राजकीय पेच ! शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिला 'हा' कानमंत्र

मुंबई :  उद्योजक अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांची गाडी आणि अटक केलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादीच्या मंत्र्याची बैठक घेतली. आपल्या मंत्र्यांना विरोधकांची व्युव्हरचना समजून घेऊन सावध राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

अँटिलिया स्फोटके प्रकरणावरून आक्रमक बनलेल्या भाजपने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  या परिस्थितीला सामोरे जाताना सावध पावले उचलण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक घेऊन याच मुद्द्यावर चर्चा केली. 

सरकारची भूमिका निश्चित

मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्च्रा झाली. एनआयएच्या पुढील तपासात राज्याचा गृह विभाग आणि महाराष्ट्र विकास आघाडी विनाकारण अडचणीत येऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यावर बोलणे झाले. एनआयएच्या तपासात एखादी गोष्ट समोर आल्यावर कारवाई करण्याऐवजी आधीच राज्य सरकार म्हणून जी काही आवश्यक कारवाई करावी लागेल, ती करण्याबाबतही यावेळी ठरल्याचे समजते. 

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक घेतली. सचिन वाझे प्रकरणाबाबत एनआयएकडून सुरू असलेल्या तपासाबाबत चर्चा केल्याचे समजते. हे सगळे प्रकरण पोलिस दलामधील काही अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे हाताळले त्याबाबत शरद पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केल्याचे समजते. याबाबत काही ज्येष्ठ मंत्र्यांवर त्यांनी जबाबदाऱ्याही दिल्या आहेत.

सेच केंद्र सरकार व  राज्यातील विरोधीपक्ष कोणती व्यूहरचना आखतोय, याबाबत सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे समजते. राज्यात सध्या सुरु असलेल्या सर्व घडामोडींमुळे आणि स्वतः शरद पवार 'एक्शन मोड'मध्ये आल्याने  पुढील काळ राज्यातील राजकीय गोटात मोठ्या हालचाली होणार आहेत, असे संकेत मिळत आहेत.

खातेबदल नाहीचसचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली असली तरी, त्यांचा रोख विशेषत: गृहमंत्र्यांवर आहे. तथापि गृहमंत्री अनिल देशमुख हे त्‍यांचे काम अतिशय योग्‍यरित्‍या करीत आहेत. त्‍यांच्या राजीनाम्‍याबाबत येणाऱ्या बातम्‍या केवळ वावड्या आहेत. महाविकास आघाडीत खातेबदलाची कोणतीही चर्चा नाही, असे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी स्‍पष्‍ट केले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !