राष्ट्रीय छात्र सेनेबाबत क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली 'ही' घोषणा

मुंबई - राष्ट्रीय छात्र सेने (एनसीसी) बाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील 'एनसीसी'च्या सोई सुविधासह विविध उपक्रमास निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

अतिरिक्त महासंचालकांसह राज्यातील ग्रुप कमांडर यांनी केली मागणी

मंत्रालयात राष्ट्रीय छात्र सेना यांच्या कार्यालयासह प्रलंबित विषयाबाबत आयोजित बैठकीत केदार बोलत होते. यावेळी एन सी.सी महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक वाय. पी. खांडुरे यांच्यासह राज्यातील सर्व एन. सी.सी.चे ग्रुप कमांडर उपस्थित होते. 

राज्यातील सर्व एन. सी.सी.गृप कमांडर यांनी आपआपल्या विभागातील सादरीकरण केले. केदार यांनी सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

निधी कमी पडू देणार नाही - क्रीडामंत्री केदार 

राष्ट्रीय छात्र सेना ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवाकार्यासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. बहुतेक सर्व शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. 

देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश असल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि इमारतीसह विविध सुविधा देण्यासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही, असे केदार यांनी सांगितले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !