'बनावट दस्तऐवजा'तून त्याने जमवली १५० कोटींची माया, नाझीरकरच्या मुसक्या आवळल्या

पुणे : बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नगररचना विभागातून निलंबित केलेला सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय 55, रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड, पुुणे) याच्या मुसक्या आवळल्या. 

त्याला महाबळेश्वर येथून जेरबंद केले आहे. बारामती न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. नाझिरकर यांच्याकडे दीडशे कोटींची बेनामी संपत्ती सापडल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे.


बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर हा पसार झाला होता. गेल्या एक महिन्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळे त्याचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात होता.

स्थानिक गुन्हे शाखेला नाझीरकर हा महाबळेश्वर परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन त्याच्यावर पाळत ठेवून त्याला अटक केली आहे.

नाझीरकर याच्या विरोधात पुणे, बारामती व इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. नाझीरकर याने बारामती येथील फळ व्यापाऱ्यांच्या नावे बनावट नोटरी केली, सोबतच त्यांच्या नावे बँकेत बनावट खाती उघडली होती. त्या बँकेच्या खात्यात स्वतः रक्कम टाकली आणि स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतली.

नाझीरकर याच्याविरोधात १५० कोटींची बेनामी संपत्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सापडली. त्यावर आपल्याला मिळालेला पैसा हा शेती उत्पन्नांतून मिळाला असल्याचे भासवण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याच्या विरोधात बागवान या फळ व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

व्यापाऱ्यांनी नाझीरकर याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेने नाझीरकरला पुढील तपासासाठी बारामती पोलिसांकडे सोपवले आहे. हनुमंत नाझीरकर याच्यावर पुण्यातील दत्तवाडी, आलंकार आणि नवी मुंबई पोलिसांकडेही गुन्हे दाखल आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !