नक्षलवाद्यांचा बसवर बॉम्बहल्ला, ४ जवान शहीद, १४ जखमी

छत्तीसगड - मंगळवारी दुपारी नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी डीआरजी फोर्सच्या जवानांच्या बसला बॉम्बने उडवले. या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले आहेत. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. इतर 12 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

ज्या बसवर बाँबहल्ला झाला, त्या बसमध्ये २४ जवान होते. त्यामुळे शहीदांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच बॅकअप फोर्सला मदतीसाठी रवाना करण्यात आले. सर्व जवान एका मोहिमेहून परत येत होते. 

नारायणपुरमध्ये नक्षलविरोधी आंदोलनानंतर डीआरजी फोर्स परत येत होती. या परिसरात घणदाट जंगल आहे. याचाच नक्षलवाद्यांनी याचा फायदा घेतला आणि बसवर बाँबहल्ला केला. जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रायपुरला पाठवण्यात आले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !