मुंबई : आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प पंखांमधील पृम्ह नेत्यांच्या हालचालींना वेग आला हे. त्यामुळे मोठ्या घडामोडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमुळे टीकेचे धनी झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळातील खांदेपालट करण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवास्थानी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीनंतर आता नाना पटोलेही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्या करता वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे.
काँग्रेसकडून काही अंतर्गत बदल केले जाणार आहे का, याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी मंत्रिमंडळ फेररचना संदर्भात महाविकास आघाडीत मोठ्या हालचालींना वेग आला आहे.
काँग्रेसमध्ये फेरबदल
काँग्रेस मध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळात खांदे पळत होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी अनेक फेर बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.