नाशिक : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाची पार्शवभूमीवर 'इथे मास्कची काय गरज', असे म्हणत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाथर्डीफाटा येथील प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका पुष्पाताई आव्हाड आणि पती साहेबराव आव्हाड पुढे सरसावले आहेत.
इथे मास्कची काय गरज ?
आव्हाड दाम्पत्याने 'वरील चुका करू नका' अशी मार्गदर्शक नियमावली लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरु केले आहे. यामध्ये हे तर माझे सहकारी आहेत; इथे मास्कची काय गरज?, हे तर माझे जिवलग मित्र; इथे मास्कची काय गरज? आणि हे तर माझे जवळचे नातेवाईक; इथे मास्कची काय गरज?
असे म्हणत नागरिक बिनधास्त विनामास्क फिरून कोरोनाला आमंत्रण देत आहेत. कोरोना वेगाने पसरण्याची ही तीन प्रमुख करणे आहेत. याबाबत प्रबोधन करण्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतलीय. तोंड, नाक व्यवस्थित झाकले जाईल असा मास्क लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
आव्हाड दाम्पत्य बनले नागरिकांच्या गळ्यातील तावीज
कोरोना संकट काळात गेल्या सहा महिन्यात आव्हाड दाम्पत्यांनी मोठ्याप्रमाणात जबाबदारीने मदतीची, सहकार्याची भूमिका बजावली. वॉर्ड ३१ मध्ये विविध प्रकारच्या विकासकामे मार्गी लावून वॉर्ड सुजलाम सुफलाम करण्यासाठी ते अग्रेसर आहेत. सध्या गामणेमळा येथील जॉगिंग उद्यानाच्या संरक्षक भिंतीचे काम हाती घेतले आहे. याठिकाणी मुलांना खेळण्यासाठी नुकताच प्ले-पार्क देखील उभारलाय.
नागरिकांना व्यायाम करण्यासाठी ग्रीनजीम उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन कामांची आखणी करून नियोजनबद्ध रीतीने ती कामे तडीस लावण्याचे काम ते जबाबदारीने पार पडत असल्याने नागरिकांच्या गळ्यातील तावीज बनले आहेत.