पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या जीपचा अपघात, उसाच्या ट्रॅक्टरने दिली धडक

अहमदनगर - जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या वाहनाला मंगळवारी सायंकाळी अपघात झाला आहे. पोलिस अधीक्षक कार्यलयाच्या दारातच असलेल्या चौकात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने एसपी पाटील यांच्या जीपला धडक दिली. 


सुदैवाने पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे यावेळी वाहनात नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोन ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर कुकडी सहकारी साखर कारखान्याला ऊस घेऊन निघाला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

या अपघातामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या नगर औरंगाबाद महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, या अपघाताच्या निमित्ताने बेकायदेशीर पध्दतीने नियमापेक्षा अधिक वजनाचा माल वाहून नेणाऱ्या वाहनांचा मुद्दा समोर आला आहे.

शहरातून दररोज ऊसाने खचाखच भरलेले ट्रॅक्टर आणि ट्रक्स मार्गक्रमण करतात. मात्र यावर कारवाई केली जात नाही. या वाहनांमुळे अपघात मात्र होत आहेत. आता तरी अशा वाहनांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !