नगर जिल्हा 'रेड झोन'मध्ये - पाच दिवसांत आढळले दीड हजार रुग्ण

अहमदनगरजिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत १ हजार ५५१ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सुरुवातीचे सलग तीन दिवस तीनशेहून अधिक, तर नंतरचे दोन दिवस सुमारे अडीचशे रुग्ण आढळले आहेत. आज (मंगळवारी) २३५ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी दिवसभरात कोरोनामुळे जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांची संख्या आता १ हजार ७५६ इतकी आहे.


दि. ५ मार्च रोजी जिल्ह्यात ३०३ कोरोना बाधित रुग्ण आढळले. दि. ६ मार्च रोजी ३२६ कोरोना बाधित रुग्ण आढळले. दि. ७ मार्च रोजी तब्बल ३६२ कोरोना बाधित रुग्ण आढळले. सलग तीन दिवस तीनशेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासन चिंतेत पडले. दि. ८ मार्च रोजी ३२५ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर ९ मार्च रोजी २२५ रुग्ण आढळले होते.

92 70 251 878 हा मोबाईल क्रमांक तुमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट करा आणि मिळवा ताज्या बातम्या
 
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आता 'रेड झोन'मध्ये झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य यंत्रणा, या विभागांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत.

आतापर्यंतची एकूण आकडेवारी

बरे झालेली रुग्ण संख्या - ७५,४४२
उपचार सुरू असलेले रूग्ण - १,७५६
एकूण मृत्यू - १,१६१
एकूण रूग्ण संख्या - ७८,३५९

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !