MPSC परीक्षा ! तर उमेदवारांना मिळणार 'ही' सुविधा

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकललेली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवारी (दि. 21) रोजी होणार आहे. प्रशासनाने या पूर्व परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालन करावयाच्या मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक एमपीएससीने जाहीर केले आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना कोविड सदृश्य लक्षणे आढळून आलेली आहेत, त्यांना पीपीई किट उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच उमेदवारांना एमपीएससीकडून मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज दिले जाणार आहे.

परीक्षा केंद्रात येताना उमेदवाराने तीन पदरी कापडाचे मास्क किंवा पट्टी बांधावी लागणार आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत उमेदवारांनी स्वच्छतेची काळजी घेऊन सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे गरजेचे आहे. 

ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे. स्वतःचा जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर आहेत. त्यामुळे उमेदवाराला परीक्षा केंद्राबाहेर पडता येणार नाही. तसेच उमेदवाराने एकमेकांचे शैक्षणिक साहित्य वापरण्यास मनाई आहे. तसेच सुरक्षित अंतर पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !