मराठी अस्मितेसाठी युवकांना मनसेचे आकर्षण, सभासद नोंदणी अभियान सुरु

अहमदनगर - टिळक रोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. मनसेचे जिल्ह्यात एक लाख सभासद करुन घेण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन या सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांचा पहिला फॉर्म भरुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अनिता दिघे, उपजिल्हाप्रमुख मनोज राऊत, शहर सचिन नितीन भुतारे, मनसे विद्यार्थी विभागाचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, परेश पुरोहित, हृतीक लद्दे, अशोक दातरंगे, रतन गाडळकर, गणेश शिंदे, विनोद काकडे, अंबादास गोटीपामूल, संकेत होशिंग, संकेत व्यवहारे, संतोष साळवे, दीपक दांगट आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणाले, मराठी बांधवांच्या न्याय, हक्कासाठी मनसे राजकारणात सक्रीय आहे. मनसेची सभासद नोंदणी सुरु करण्यात आली आहे. युवकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी युवा शक्तीने परिवर्तन शक्य आहे. 

पण इतर पक्षाचे राजकारणी त्यांचा वापर आपल्या आपला हेतू साध्य करण्यासाठी करीत आहे. मनसेत युवकांना एक वेगळी दिशा देऊन त्यांना नेतृत्वाची संधी निर्माण करुन देण्यात आली आहे. मनसे पक्षाच्या या धोरणामुळे युवक मनसेकडे आकर्षित होत असल्याची भावना व्यक्त करुन, त्यांनी मराठी अस्मितेसाठी युवकांना मनसेचे सभासदत्व अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !