दिल धुंडता हैं फिर वही..

किती अनुभवांनी भरलेलं असतं ना आपल जीवन.. कटू, गोड अनुभव जगलेलो असतो आपण.. अगदी त्याच्या खोल तळाशी जात डुबकी मारूनही येतो कधी... जगण्याची आर्तता, कुतूहल, आशा, निराशा, आनंद, दुःखांनी तुडुंब भरलेले असतं हे जग..

या साऱ्यांना स्पर्श करीत, कधी बाजूला सारत, नवनव्या आशांना जन्म देत, जीवननौका हळूहळू पार करत असते आपला प्रवास.. नेमकं केलं काय आपणं आयुष्यात ? याचा ठोकताळा या हिशेबापुरता मर्यादित नसतो कधीच..

मग तिथे कधी आपलं बालपण पुन्हा येत असत दुडू दुडु धावत.. शाळा आठवते.. कॉलेजच्या कट्ट्यावर जमलेली दोस्तांची मैफल सुखावून जात असते.. आजही ही मैत्री भेटली की आपणं कुठेही बदललेलो नसतोच मुळी.. स्वभावाचा हा अनोखा गुणधर्म तुमच्या आमच्यात कायमच दडलेला असतो..

दिल धुंडता हैं फिर वही फुरसत के.. यासारखी गाणीही गुणगुणत बसायची सवय असते आपल्याला.. आयुष्यातील खूप काही शेअर करावस वाटतं असत कधी... जगण्याचा तो फुलोरा असतो... हवेची झुळूकही.

आई, बाबा, ताई, भाऊ, मावशी, मामा, काकू, आत्या...अशी सारी नाती... जन्मतःच रुजलेली.. त्यासोबत मित्रांच्या, सवंगड्यांच्या नात्यांची गुंफण.. आनंदयात्री... आपलं जग... मनाला आनंद देणारा निसर्ग... कधी दुःख, तर कधी व्याकुळता.. 

संध्येला केशरी क्षितिज.. अन् सोबत समुद्र किनारा.. मन हलकं करणारा.. माया करीत कुशीत घेणारा... पाठीवर हलकेच हात फिरवणारा... कृतज्ञता माऊलीची.. जगणं आश्वासक करणाऱ्या या साऱ्यांची...

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !