मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणा स्कॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या व अँटिलिया प्रकरणात तपास करत आहे. या तपासात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. एमआयएच्या टीमने मुंबईच्या मिठी नदीतून काही महत्वाच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
एक कम्प्यूटर हार्ड डिस्क, DVR, CD, एका गाडीच्या दोन नंबर प्लेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे एमआयए पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. आता या नंबर प्लेटविषयी देखील एक नवीन खुलासा समोर आला आहे.
ही नंबर प्लेट जालना येथे राहणाऱ्या विनय नाडे यांच्या चोरी झालेल्या 'मारुती इको' कारची आहे. नाडे हे राज्याचे समाज कल्याण विभागात क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे आता आणखी एका नव्या अंगाने हा तपास सुरु झाला आहे.
संजय राऊत म्हणतात, मी तर सांगितले होते..
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे की, पोलिसात सचिन वाझेला पुन्हा घेण्याची योजना आखत होते. तेव्हाच मी काही नेत्यांना सांगितले होते त्यांचे वागणे व काम करण्याच्या पध्दती सरकारला अडचणी निर्माण करू शकते. वाझे आणि त्याच्या कामांविषयी मुख्यमंत्र्यांना पुरेशी माहिती नव्हती, असेही राऊत म्हणाले.