महावितरणचे लाचखोर दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

 जळगाव : सहा हजारांची लाच स्वीकारताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ रविंद्र धनसिंग पाटील (सब स्टेशन विदगाव ता. जि. जळगाव) आणि कंत्राटी वायरमन प्रल्हाद उत्तम सपकाळे (विदगाव – जळगाव) असे चे नाव आहे. 

अमोदा खुर्द ता. जि. जळगाव येथे स्वत:च्या शेतातील हॉटेलमधे विज संयोजन मिळण्याकामी तक्रारदाराने विज कंपनीकडे रितसर अर्ज केला होता. तसेच डिमांड नोट देखील जमा केली होती. तरीदेखील तक्रारदारास सात हजाराची लाच दोघांनी मागीतली होती. या मागणी केलेल्या लाचेच्या रकमेपैकी सहा हजाराची लाच पंचांसमक्ष घेतांना दोघे जण एसीबीच्या जाळ्यात अडकले.

जळगावच्या लाचलुचपतचे डिवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म. पो. हे. कॉ.शैला धनगर, पो. ना.मनोज जोशी, पो. ना.सुनिल शिरसाठ, पो. ना.जनार्धन चौधरी, पो. कॉ.प्रविण पाटील, पो. कॉ.नासिर देशमुख, पो. कॉ. ईश्वर धनगर, पो. कॉ. प्रदिप पोळ आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !