हर हर महादेव ! घरीच करा महाशिवरात्रीची पूजा, मंदिरात गर्दी नकोच..

मुंबई - यंदाही महाशिवरात्री सणावर कोरोनाचे सावट आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक शिवमंदिराच्या आतील बाजूस सोशल डिस्टन्सीगचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शक्यतो भक्तांनी मंदिरात गर्दी न करता घरीच पूजा-अर्चना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकावेळी फक्त ५० भाविक दर्शन घेतील, यादृष्टीने संबंधित विश्वस्त अथवा व्यवस्थापक यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असेही प्रशासनाने सांगितले आहे. 


मंदिर व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर)चे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या परिसरात हार व फुले विक्रेते यांनी गर्दी करु नये, तसेच सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे तंतोतंत पालन होईल, याकडे मंदीराचे व्यवस्थापक व स्थानिक प्रशासन यांनी विशेष लक्ष द्यावे. 


महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत, असेही आदेशात म्हटले आहे. पत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वतःहून मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जेष्ठ नागरीक व लहान मुलांना मंदिरात दर्शनाकरीता आणू नये, असे आदेशात म्हटले आहे. 

कोविड- १९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ऑनलाइन दर्शन सुविधा द्या

शिवमंदिरातील व्यवस्थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईटद्वारे उपलब्ध करून द्यावी, आशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !