नाईलाज | 'या' चौदा जिल्ह्यात 'लॉकडाऊन' निश्चित..

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन जारी केले होते. २३ मार्चला या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाले. पण यंदाही महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगाने होणारा कोरोनाचा प्रसार लक्षात घेतला, राज्य सरकार हे पाऊल उचलणार आहे. ज्या जिल्ह्यात वेगाने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत, तेथे ही शक्यता आहे.

नांदेड, परभणी आणि बीड या जिल्ह्यामध्ये आधीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील अन्य १४ जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, जालना, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. 

राज्याचा विचार केला तर एकट्या मार्च महिन्यात आतापर्यंत ३ लाख ४३ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३०० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कदाचित महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये वाढती रुग्ण संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचे संकेत दिले होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !