पुणे - तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्या भारताने इंग्लंडला ७ धावांनी धूळ चारली. या विजयासोबत भारतीय संघाने पुण्यात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लिश टीमला ५२ दिवसात तिन्ही प्रकारात पराभव पत्करावा लागला आहे.
५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या क्रिकेट सामन्यांत भारताने ४ कसोटी सामन्यांची मालिका ३-१, पाच टी-२० सामन्यांची मालिका ३-२ ने, तसेच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ जिंकली आहे. देशभरात या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.
अखेरच्या निर्णायक सामन्यात भारताने टॉस हाला. तरीही प्रथम फलंदाजी करताना भारतीय टीमने ४८.२ षटकांमध्ये सर्वबाद ३२९ धावा केल्या. उत्तरादाखल इंग्लंडच्या संघाने ९ गडी गमावून ३२२ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक ९५ धावा केल्या.
भारताने रचला धावांचा डोंगर
भारतीय टीमने वेगवान सुरूवात करताना १४ ओव्हरमध्ये १०० धावा केल्या. रोहित शर्मा ३७ धावांवर आदिल रशीदच्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला. रशीदने भारताची धावसंख्या ११७ असताना शिखर धवनला ६७ धावांवर कॅच आउट केले. यानंतर मोइन अलीने भारतीय कर्णधार विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले.
शार्दुलने घेतले ४ बळी
आजच्या एकदिवसीय सामन्यांत पहिल्यांदा इंग्लंडची खराब सुरुवात राहिली. इंग्लंडने २८ धावांवर २ विकेट गमावल्या. भुवनेश्वरने दोन्ही ओपनर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोला पवेलियनमध्ये पाठवले. यानंतर टी नटराजनने बेन स्टोक्सला ३५ धावांत बाद केले. यानंतर शार्दूल ठाकुरने कर्णधार जोस बटलरला १५, लियाम लिविंगस्टोन ३६ धावा, मलानश् ला ५० धावांत व रशीदला बाद केले.