बायकोसोबत केलेल्या 'त्या' कृत्यासाठी कोर्टाने पतीला ठोठावली 'ही' शिक्षा

अहमदनगर - अंगाचा थरकाप उडेल, अशी निर्घृृृण वागणूक बायकोला देणाऱ्या एका नराधम नवऱ्याला नगरच्या जिल्हा न्यायालयाने कडक शिक्षा ठोठावली आहेे. पत्नीच्या अंगावर एसीड टाकुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी पतीला १० वर्ष सक्तमजुरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी बुधवारी दुपारी हा निकाल दिला. आरोपी श्रीकांत मोरे (रा, प्रबुध्दनगर, आलमगीर, भिंगार) अहमदनगर असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगद्रे - शिंदे यांनी काम पाहिले. 

नेमके काय घडले होते ? 

पिडीत महिलेचे मे २०१८ मध्ये आरोपीसोबत लग्न झाले होते त्यांना २ मुले असुन आरोपी तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद करून त्रास देत असे. आरोपीच्या सततच्या वागण्यामुळे फिर्यादी पिडीत महिला ही आरोपीपासुन वेगळी तिच्या आईकडे राहायची. 

एकदा ही महिला जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकाबरोवर तिच्या मुलाला शाळेतुन घरी आणत होती. त्यावेळी श्रीकांत मोरे त्यांना आडवा आला. त्याने शिक्षकाला तेथून निघुन जाण्यास सांगितले. नंतर त्याने खिशातुन एक बाटली काढली व "आता तुला जीवे ठार मारतो." असे म्हणत बाटलीतील एसीड तिच्या डोक्यावर ओतले.

तिच्या डोक्यामध्ये, मानेवर, पाठीवर, छातीवर हे एसीड ओघळल्याने तिला भाजले व त्यामुळे तिला प्रचंड मरणयातना होवु लागल्या. त्या अवस्थेत पिडीत महिला रस्त्यावर काही वेळ पडून राहिली. नंतर तिला काही जणांनी थेट रुग्णवाहिकेतून सिव्हील हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले. 

घटना घडली त्या दिवशीच भिंंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पेालिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी रूग्णालयात जाऊन पिडीतेचा जवाब नोंदवला. भिगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे मोरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. फौजदार सचिन कवडे यांनी गुन्हयाचा तपास न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिक्षक, वैद्यकिय अधिकारी, तपासी अंमलदार, विशेष न्यायदंडाधिकारी व साक्षीदार, यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा कोर्टाने ग्राह्य धरला आणि आरोपी मोरे याला शिक्षा सुनावली.

हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे साहेब याचे न्यायालयात चालला. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगद्रे - शिंदे यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षाच्या वतीने एकुण ६ साक्षीदार तपासले व त्यांची सरतपासणी केली.

विशेष सरकारी वकील मनिषा शिंदे म्हणाल्या..

महिलांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. तो कुणालाही हिरावुन घेता येत नाही. एसीड हल्ल्यामुळे पिडीतेचे शारिरीक व मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखल्या जाव्यात, समाजातील विकृत मानसिकतेमध्ये सुधारणा व्हावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील मनिषा शिंदे यांनी केला. या खटल्याच्या सुनावणीला पैरवी अधिकारी मारूती बोराटे यांनी सहकार्य केले.

नेमकी काय सुनावली शिक्षा ?  

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, या कलमान्वये दोषी धरले. आरोपीस १० वर्ष सक्तमजुरी शिक्षा ठोठावली. तसेच ५० हजार रुपये दंड केला आहेे. दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद, दंडाच्या रक्कमेपैकी ४० हजार रूपये पिडीतेस देण्याचा व उर्वरीत दंड सरकार जमा करण्याचा आदेश पारीत केला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !