देशात हिंदूंच्या हत्या वाढल्यात, कारवाई कधी करणार ?

हिंदुत्ववादी संघटनांनी केले राज्यभर ऑनलाईन आंदोलन 

अहमदनगरगेल्या काही वर्षात देशभरात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना वेचून, पाळत ठेवून ठार मारणे अशा घटनात लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत प्रशासनाने आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 


नुकतेच दिल्ली आणि केरळ येथे हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत. आतापर्यंतच्या या हत्यामध्ये गुन्हेगार कोण आहेत ? हे विविध अन्वेषण यंत्रणाना स्पष्ट असूनही संबंधित राज्य शासनाकडून या प्रकरणामध्ये ठोस कारवाई होताना दिसत नाही. या हत्या रोखण्यासाठी त्या त्या राज्यातील पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचेही दिसत आहे . 

यामुळे आक्रमणकर्त्यांचे मनोबल वाढत आहे. पोलीस आणि तेथील राज्य सरकार या हत्या दडपण्याचा प्रयत्न करतात. अशा हत्या एका व्यापक सुनियोजीत कटाचा भाग असल्याचे सप्ष्टपणे दिसत आहे. तरी या हत्या करणारे धर्मांध, त्यांच्याकडून हत्या करवून घेणारे सूत्रधार, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे यांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीने गुरुवारी ऑनलाईन आंदोलन केले. 

तसे प्रशासनास निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जामखेड, श्रीरामपूर, तिसगाव व नगर शहर, शहरातील गवळीवाडा, वाळुंज, भिंगार, अरणगाव येथील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या प्रकरणांची केंद्रीय विभागाने सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने करोना काळातील सर्व नियम पाळत नगर येथील तहसीलदार गृह शाखा आर. जी. दिवाण यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले आहे. 

यावेळी निवेदन देताना समितीचे रामेश्वर भूकन, परमेश्वर गायकवाड, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्ञानेश्वर बेरड, सुरेश नाट, हे उपस्थित होते. 


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !