अंगणवाडीतुनच विद्यार्थी गिरवितात शिस्तीचे धडे : हर्षदा काकडे

शेवगाव : अंगणवाडी ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. विद्यार्थ्यांना लहानपणीच शिस्त लावण्याचे काम अंगणवाडीमधूनच होत असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या लाडजळगाव गटातील दिवटे येथे काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून ८ लाख ३० हजार रुपयांच्या नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक नानासाहेब कणसे होते. संजीवनी व शहादेव जावळे, कल्पना व सोपान कणसे या दाम्पत्यांच्या

हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी देवराव दारकुंडे, उपसरपंच हरिभाऊ फाटे, किसन राठोड, लहू वडते, चंद्रकांत पोटभरे, रामेश्वर पोटभरे, भारत लांडे, भाऊसाहेब पोटभरे, नानाभाऊ चेमटे, दुर्गाजी रसाळ, दत्तात्रय जाधव आदी होते.

काकडे म्हणाल्या की, लाडजळगाव गटातील प्रत्येक गावात विकास कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो मी पूर्ण करणारच. गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे जिल्हा परिषदेचा निधी कोविडसाठी देण्यात आला. त्यामुळे विकास कामे करता आली नाहीत. आता थोडाफार निधी येत असल्याने त्यातून विकास कामे हाती घेतली आहेत. 

अंगणवाडीचे काम गावकऱ्यांनी दर्जेदार करून घ्यावे. ठेकेदाराशी सकारात्मक राहून काम चांगले कसे होईल, हे पहावे. याच इमारतीत तुमची मुले शिक्षणाची सुरुवात करणार आहेत. इथूनच त्यांना संस्कार, शिस्तीचे व प्रामाणिकतेचे धडे मिळणार आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !