'जो' महोत्सव पाहायला तो दरवर्षी पुण्याला जायचा, आता 'त्याच' महोत्सवात झळकणार त्याचा 'सिनेमा'

अहमदनगर - नगरच्या मातीतील उत्कृष्ट कलाकार हरिष बारस्कर यांनी अभिनय केलेला 'फिरस्त्या' हा सिनेमा आगामी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार आहे. हरिष बारस्कर यांनी एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा, लघुपट, मराठी मालिका आणि सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे, तसेच विविध स्पर्धांमध्ये परितोषिकेही पटकावली आहेत. 

हरिष बारस्कर यांनी पदवीचे शिक्षण घेत असताना छंद म्हणून अभिनयाची गोडी लागली. एकांकिकेत मिळालेल्या पारितोषिकामुळे त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचे ठरवले. मात्र घरची कोणतीही पार्श्वभूमी नसताना निर्मिती रंगमंच ही नाट्यसंस्था सुरू करून या संस्थे मार्फत नाटयनिर्मिती चे काम केले. 

हरिष बारस्कर यांच्या 'खटारा', 'शके१८३१', 'सपान पडलं', या नाटकांमधील तसेच 'खटारा', 'वारुळातली मुंगी', 'ड्रायव्हर', अर्धांगिनी, कोंडवाडा या एकांकिकेतील अभिनयाची अनेकांनी प्रशंसा केली. हरिष यांनी यापूर्वी 'घुमा', 'सवित्र्यायण', 'अरुणा', 'चेपस', 'ट्रिपल सीट' या सिनेमात भूमिका केलेल्या आहेत. तसेच 'एक होती राजकन्या', 'विठू माऊली', 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत.

आता हरिष यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या "फिरस्त्या" या कौटुंबिक व संवेदनशील विषयावर आधारित सिनेमाचे  लेखन - दिग्दर्शन विठ्ठल भोसले यांनी केलेले असून डॉ. स्वप्ना विठ्ठल भोसले यांच्या "झुंजार मोशन पिक्चर्स" निर्मिती संस्थे द्वारे निर्मिती केलेली आहे. दि. ११ ते १८ मार्च या कालावधीत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा होत आहे. त्यात हरिष यांचा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने नगरकरांची मान उंचावली आहे.

नाटक पाहण्यासाठी जायचे पुण्यात

हरिष यांना नाटकाची आवड निर्माण झाली, परंतु नगरमध्ये तेव्हा चांगली व्यावसायिक नाटके सादर होत नव्हती. म्हणून हरिष बारस्कर आणि काही मित्र शनिवारी सायंकाळीच पुण्याला जायची. शनिवारी रात्री, रविवारी दिवसभर नाटक पाहून ही मंडळी पुन्हा नगरला यायचे. या हौसेतूनच अभिनयाचे धडे त्यांनी घेतले. पुण्यात तीन वर्षांपासून PIFF पाहत होतो आणि आज स्वतःचा सिनेमा या महोत्सवात प्रदर्शित होत असल्याचा विशेष अभिमान वाटत असल्याचे त्यांनी MBP Live24 ला सांगितले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !