ग्रामसेवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'थेट' मंत्रालयात धाव

अहमदनगर - ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव राजेश कुमार यांनी मुंबईत बैठक घेतली. विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेच्या वेळी उपसचिव वित्त विभाग जाधवर, अवर सचिव कराड, मनरेगाचे उपसचिव, कक्ष अधिकारी, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, संजीव निकम, सुचित घरत, कल्पेश अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती, प्रवास भत्ता वाढ, पदवीधर ग्रामसेवक भरती, वैद्यकीय कॅशलेस सुविधा, अतिरिक्त कामकाज कमी करणे, ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी खर्च बाबत येणार्‍या अडचणी, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 49 बाबत, जुनी पेन्शन योजना लागू करणे, आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढी देणे, या विषयांवर चर्चा झाली. 

सर्व प्रलंबित प्रश्न तसेच मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्याची ग्वाही या बैठकीत देण्यात आली, अशी माहिती एकनाथ ढाकणे यांनी दिली आहे. ग्रामसेवकांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, त्यासाठी संघटना कटीबद्ध आहे, अशी गवाही देखील ढाकणे यांनी यावेळी दिली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !