स्वच्छतेतून समृद्धीकडे ! घोडेगाव कचरामुक्त करण्यासाठी 'हिचे' आगमन

घोडेगाव - नेवासे तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे. या घंटागाडीचे उदघाटन ग्रामपंचायत ऑफिस येथे करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व ग्रामपंचायतचे मार्गदर्शक सचिन देसरडा, लोकनियुक्त सरपंच राजेंद्र देसरडा, उपसपंच यशवंत येळवंडे, आदी उपस्थित होते. 

देसरडा गटाने घोडेगांव ग्रामपंचायतचा पदभार घेण्यापूर्वी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य होते. पदभार घेतल्यानंतर पहिल्या ८ दिवसाच्या आतमध्ये बऱ्याच दिवसापासून बंद असलेला ट्रॅक्टर दुरुस्त करून गावातील स्वच्छतेचे काम हाती घेतले. पण बऱ्याच भागामध्ये ट्रॅक्टर जात नसल्याने गावात कचऱ्याचा प्रश्न कायम होता. त्यामुळे घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे.

गावातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी घेतली आहे. गावातील सर्व गटारी भूमिगत बंदिस्त करण्यात येत आहे. तसेच गावातील स्वच्छता करण्यास पाहिले प्राधान्य देण्यात येत आहे. - राजेंद्र दगडुराम देसरडा (सरपंच, घोडेगांव)

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कदम, दिलीप काळे, निसार सय्यद, अशोक टेमकर, भगत वैरागर, राजेंद्र येळवंडे, पता येळवंडे, पारस चोरडिया, अलीभाई शेख, रमेश जाधव, अनिल सोनवणे, वसंत सोनवणे, मधुकर आल्हाट, विष्णू गिरहे, मनोज बोरुडे, विजय आव्हाड, संजय चेमटे, राज चोरडिया, शरद सोनवणे, स्वप्नील सोनवणे, फक्कड बरहाटे, पंकज लांभते, शिवा इखे, डॉ. सुनील चौधरी, दिलीप शिंदे, प्रकाश दारकुंडे, कैलास शिंदे, राजू जाधव हेही यावेळी उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !