बळजबरी पाण्याच्या बाटल्या व वडापाव घेतले म्हणून गजा मारणेवर दरोड्याचा गुन्हा

पुणे - दोन आठवड्यांपूर्वी खूनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा मारणे उर्फ गजानन मारणे याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारणे याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक निघाली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही शेकडो चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक आली. या दरम्यान एके ठिकाणी वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या पैसे न देता घेतल्या म्हणून मारणे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


सध्या अटकेच्या भीतीने गजा मारणे फरार आहे. बेकायदा जमाव जमवला, सरकारी कामात अडथळा आणला तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटकेच्या भीतीने मारणे फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

उर्से टोलनाक्यावर एका दुकानातून पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्या, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ही माहिती दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !