नाशिक - डॉक्टर पत्नीच्या चुकीच्या उपचारांमुळे मुलाला जीव गमवावा लागल्याचा आरोप असणाऱ्या संबंधित डॉक्टर पाटील यांचा 'बालदत्त' हा दवाखाना तत्काळ सील करण्याचे आदेश जिल्हा रुग्णालय प्रशासनाने लेखी पत्राद्वारे दिले.
योग्य ती कारवाई करण्यासाठी रुग्णालय प्रशासन या कुटुंबाला सर्वस्वी मदत करेल, असे आश्वासन लेखी पत्राद्वारे दिल्यानंतर संबंधित मृत मुलाचे आई-वडील यांनी सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.
सिव्हिल हॉस्पिटल : मृत मुलाच्या आईवडिलांना कारवाईचे लेखी पत्र देताना डॉ. श्रीवास |
डॉक्टर पत्नीचे चुकीचे उपचार
या प्रकरणातील सरकारी डॉक्टर स्वप्नील पाटील यांना स्वतः चा दवाखाना सुरु करण्याचा कुठलाही अधिकार नसताना त्यांनी लासलगाव येथे बालदत्त नावाचा बोगस दवाखाना सुरू केल्याचा आरोप आहे.
त्या ठिकाणी त्यांची पत्नी डॉक्टर नसतांनाही त्यांनी स्वतःला डॉक्टर दाखवून कोरे यांच्या मुलावर औषोधोपचार केले, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या चुकीच्या उपचारांमुळे त्या मुलाची तब्येत आणखी खालावली म्हणून त्या मुलाला रुग्णवाहिकेद्वारे नाशिकला पाठविले.
परंतु नाशिकला आल्यानंतर अर्ध्या तासातच मुलाचा मृत्यू झाला. यानंतर मृत मुलाच्या आई-वडिलांनी चौकशी केली असता स्वप्नील पाटील यांच्या पत्नी यांचा कुठलाही वैद्यकीय अभ्यास नसतांना चुकीचे उपचार केल्यामुळे त्यांचा मुलगा दगावला असल्याचे लक्षात आले.
चुकीच्या उपचारामुळे मुलाचा मृत्यू
शासकीय जिल्हा रुग्णालयात संतोष ताराचंद कोरे यांच्या मुलाचा चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलाच्या आई-वडिलांनी केला आहे.
त्या मुलाला न्याय मिळावा याकरिता त्याचे आई-वडील गेल्या सहा दिवसांपासून शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक याठिकाणी उपोषणाला बसले होते.
सरकारी डॉक्टर स्वप्नील पाटील यांना स्वतः चा दवाखाना सुरु करण्याचा कुठलाही अधिकार नसताना त्यांनी बालदत्त नावाचा बोगस दवाखाना सुरू करून त्या ठिकाणी त्यांची पत्नी ज्या डॉक्टर नसतांनाही त्यांनी स्वत:ला डॉक्टर दाखवून कोरे यांच्या मुलावर औषोधोपचार केले.
चुकीचे उपचारांमुळे त्या मुलाची तब्येत आणखी खालावली म्हणून त्या मुलाला रुग्णवाहिकेद्वारे नाशिकला पाठविले. परंतु नाशिक ला आल्यानंतर अर्ध्या तासातच मुलाचा मृत्यू झाला.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी चौकशी केली असता स्वप्नील पाटील यांच्या पत्नी यांचा कुठलीही वैद्यकीय अभ्यास नसतांना चुकीचे उपचार केल्यामुळे त्यांचा मुलगा दगावला असल्याचे लक्षात आले.
आपल्या मुलाला न्याय मिळावा याकरिता त्यांनी गेल्या चौदा महिन्यांपासून सर्व कागदपत्रे जमवली आणि सदर दोषी डॉक्टर व त्याच्या बोगस डॉक्टर पत्नीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांच्या खाजगी हॉस्पिटलला तात्काळ बंद करावे, अशी मागणी केली.
या मागणीकरिता गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू होते. परंतु कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
छावा क्रांतिवीर सेनेचा पुढाकार
छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन संबंधित प्रशासनातील अधिकरी व नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांना याबाबत जाब विचारला तसेच यात कशा पद्धतीने चुकीची कारवाई झालेली आहे हे लक्षात आणून दिले.
या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा व त्या कुटुंबाला तात्काळ लेखी पत्र देऊन आपण जी काही कारवाई केलेली आहे, त्याची माहिती द्यावी अशी मागणी केली. अन्यथा या ठिकाणी छावा, शिवसेना, प्रहार संघटना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
त्यानंतर तात्काळ प्रशासनाने लेखीपत्र काढत संबंधित डॉक्टरचा दवाखाना तात्काळ सील करावा, असे आदेश दिले. तसेच पुढील योग्य ती कारवाई करण्यासाठी रुग्णालय प्रशासन या कुटुंबाला सर्वस्वी मदत करेल, असे आश्वासन लेखी पत्राद्वारे दिले.
या कुटुंबाचे सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याची विनंती त्या कुटुंबाला केली. त्या कुटुंबाचेही समाधान झाल्यामुळे त्यांनी हे उपोषण सोडले.
या कुटुंबाला जोपर्यंत संपुर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत या कुटुंबाच्या पाठीशी छावा क्रांतिवीर सेना शिवसेना, प्रहार संघटना, भरभक्कम पणे उभे राहून या कुटुंबाला न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही संघटनेच्या वतीने देण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनरावजी घोलप, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीनिवास, उत्तर महाराष्ट्र सपंर्कप्रमुख दत्तु बोडके, शिवसेना वैद्यकीय आघाडीचे योगेश म्हस्के,
उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोखे, महिला अध्यक्ष शोभा वरपे, सामाजिक कार्यकर्ते सागर आहेर, दीपक डोके ललित डगळे, जिल्हा रुग्णालयाअधिकारी गहिनीनाथ जाधव यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.