जागेच्या उतार्यातून परस्पर नावच वगळले
शेवगावच्या तहसीलदारांपासून महसूलमंत्र्यांपर्यंत तक्रार अर्जातून मांडली कैफियत
शेवगाव : कालपरवा पर्यंत उताऱ्यावर येणारे नाव अचानक चापडगाव (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील तलाठ्याने वगळल्याचा आरोप शेतकरी कारभारी सीताराम मडके यांनी तक्रार अर्जाद्वारे केला आहे. तहसीलदारांपासून महसूल मंत्र्यांच्या दरबारात न्यायासाठी धाव घेत त्यांनी आपली कैफियत मंडळी आहे. घेतली आहे. मडके यांनी ८ मार्च रोजी तक्रार अर्ज करून आपबिती नमूद केली आहे.
पीडित शेतकरी कारभारी मडके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मी मौजे चापडगाव येथील गट नं. ५५३ / १ या जमिनीचे ९९ वर्षाचा साठेखत वर करारनामा संबंधितान कडून करून घेतला होता. त्या अनुषंगाने अनेक वर्षांपासून वरील गट नं. मधील ७ / १२ उताऱ्यावर माझ्या पत्नीचे नाव लावलेले होते.
दरम्यान नुकतेच ०२ जून २०२० रोजी मी सदर जागेचा काढलेल्या उताऱ्यावर माझ्या पत्नी सावित्रा कारभारी मडके यांचे नाव स्पष्टपणे आपले होते. त्यानंतर ०२ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन उतारा काढला असता पत्नीचे नाव इतर हक्कात गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गेल्या आठवड्यात ०९ मार्च रोजी काढलेल्या उतार्यात नाव थेट वगळून टाकल्याचे आढळल्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
अचानक झालेल्या बदलाबाबत संबंधित कामगार तलाठी यांच्याकडे विचारणा केली. मात्र, याबाबत ते कुठल्याही प्रकारे प्रतिसाद द्यायलातयार नाहीत. त्यामुळे उताऱ्यावरील पत्नीचे नाव कमी करणे, इतर हक्कात लावणे, यानंतर त्यावर खाड़ाखोड करणे ही बाब संशयास्पद आहे.
हा अचानक केलेला बदल तलाठी पवार यांनी कोणाच्या सांगण्यावरून केलाय, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच सदर उताऱ्यावरील माझ्या पत्नीचे नाव पूर्ववत करून मला न्याय मिळावा, अशी दाद मागण्यात आली आहे. याशिवाय न्याय न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही तक्रार अर्जात म्हटले आहे.
तब्ब्ल पंधरा वर्षांपासून वास्तव्य...
दरम्यान, कारभारी मडके यांनी सदर जागा ही २००२ पासून खरेदी केली आहे. तसेच प्रत्यक्ष १५ वर्षांपासून ते आपल्या कुटूंबासह या जागेवर राहतात. तसेच या जागेवरील वीज मीटर त्यांच्याच नावावर आहे. याशिवाय वीज बिल, घरपट्टी, नळपट्टी आदी तब्ब्ल पंधरा वर्ष पासूनची कागदपत्रे त्यांच्याच नावावर आहेत.
अशा परिस्थितीत तलाठी पवार यांनी उताऱ्यावरील नाव कसे काय कमी केले हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल तीआस होऊन सदर शेतकऱ्यास न्याय मिळने गरजेचे आहे.
तलाठी म्हणतात...
दरम्यान, 'एमबीपी लाईव्ह २४' ने चापडगावचे तलाठी के. यु. पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी कारभारी मडके यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. ते कार्यालयात येत असतात. त्यांच्या जागेच्या उतार्या बाबत नेमके काय झाले हे मला पहावे लागेल. त्यांच्या सर्व कागदपत्रांची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.