'वंचित'चे धरणे ! 'वृद्धेश्वर'च्या संचालक मंडळास शेतकऱ्यांनी दिला 'हा' इशारा

शेवगाव : येत्या १५ एप्रिल पर्यंत सर्व शेतकर्यांचे ऊस घेऊन न गेल्यास अतिशय तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी आज वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह संचालकांना दिला. 

वंचित बहूजन आघाड़ी व शेतकरी बांधव यांनी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मुख्यकार्यकारी अधिकारी, संचालकांच्या दालना समोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

यावेळी किसन चव्हाण यांनी शेतकऱयांच्या मागण्या संचालक मंडळासमोर मांडल्या. वडुले येथील शेतकऱ्यांच्या उसाला १५ महिने उलटूनही अद्याप तोड आलेली नसल्याने तब्ब्ल ३० टक्के ऊस उभा असल्याचे  निदर्शनास आणून दिले. 

तसेच ऊस नेण्यास कारखान्याकडून उशीर होत असल्याने शेतकयांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल जाब विचारला. कारखान्याच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचे सांगत त्वरित शेतकऱ्यांच्या उसाला तोड द्यावी अशी आग्रही मागणी केली. 

१५ एप्रिलपर्यंत ऊस न नेल्यास तीव्र आंदोलन

त्यावर संचालक मंडळाने १५ एप्रिलपर्यंत उरलेला सर्व ऊस कारखाना घेईल, असे आश्वासन दिले. मात्र कारखान्याने आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलन छेडणार आल्याचा इशारा चव्हाण यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी दिला.

आंदोलन प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख ,पाथर्डी तालुका अध्यक्ष रविन्द्र म्हस्के, सोमनाथ सर्जेराव आव्हाड, आदिनाथ महादेव आव्हाड, सलीम जिलानी शेख ,संदिप महादेव आव्हाड, संभांजी महाले, प्रशांत निळ, गोकुळ नागरे, रमेश रणमले, बापुसाहेब तुतारे, कानिफनाथ आव्हाड.

तसेच वडुले खुर्द येथील ऊस उत्पादक सभासद, शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे एमडी पवार, उध्ववराव वाघ, श्रीकांत मिसाळ, बाळासाहेब गोल्हार, ॲड. अनिल फलके व कृषी आधिकारी आकोलकर, तसेच वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !