तब्बल 'एव्हढ्या' शेतकर्याना पीकविमा कंपन्यांचा झटका

नवी दिल्ली : शेतकर्याना मिळणाऱ्या पीक विम्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्रायलयाकडून मिळालेल्या माहितीतून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विमा कंपन्यांनी वर्ष 2019-20 या वर्षात एकूण 9 लाख 28 हजार 870 शेकऱ्यांचे पीकविम्याचे क्लेम रद्द केले आहेत. विमा कंपन्यांनी या शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही.

नैसर्गिक आपत्ती किंवी संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. 

कृषी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली (म्हणजेच मोठा दुष्काळ, अतिवृष्टी) तर पिकाचे नुकसान झाल्याचा दावा करण्याची गरज नाही. 

कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर हंगामाच्या शेवटी उत्पादनात झालेल्या नुकसानाच्या आधारावर पिकाचे नुकसान मोजले जाते. मात्र यामध्येसुद्धा काही अपवादात्मक बाबीत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे झालेले नुकसान सरकारला सांगावे लागते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !