'असेही' आंदोलन ! 'स्वाभिमानी'चा महावितरणला शॉक

शेवगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अर्धनग्न आंदोलन करून महावितरणला शॉक दिला. वडुले ग्रामीण सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत शेवगाव वीज अभियंता यांना बुधवारी निवेदन देऊन अनोखे आंदोलन केले. 

दोन महिन्यापासू या भागातला शेतकरी अंधारात राहत आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना महावितरणकडून करण्यात आली नाही. या भागातील विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान होत आहे. रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे मुशकील बनले आहे.

भविष्यात तीव्र आंदोलन

महावितरणकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी करूनही उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना मिळत होती. येथील कर्मचारी अडवणुकी ची भाषा करत होते. या पार्श्वभूमीवर वैतागून शेवगाव येथील गाडगे बाबा चौकांतील वीज वितरण अभियंता कार्यालयात वडुले ग्रामीण येथील शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले. 

यावेळी वडुले ग्रामीण सिंगल फेज वीज जोडण्यासाठी विनंती केली. तसेच शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत महावितरणचा निषेध केला. महावितरणने दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याची भूमिका आक्रमक शेतकऱयांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी शेतकरी संजय पांडव, काकासाहेब जाधव, जालिंदर शिंदे, ज्ञानेश्वर कराड,अक्षय कराड, रामकिसन कराड, प्रताप परदेशी, किसनराव हरवणे, जालिंदर ढाकणे, शंकरराव हरवणे, जालिंदर फुंदे, गायकवाड तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष भाऊ बैरागी, तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे, दीपक कुसळकर, वडुले बुद्रुक ग्रामस्थ उपस्थित होते. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !