'MBP Live24'चा दणका ! महसूल प्रशासन हलले... आणि तलाठ्याने 'त्या' शेतकऱ्याचे नाव उताऱ्यावर लावले

शेवगाव : चापडगाव (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील तलाठ्याने शेतकऱ्याचे नाव उताऱ्यावरून वगळल्याचा प्रताप केला होता. त्याची दखल घेऊन 'MBP Live24' ने 'न्यायासाठी शेतकऱ्याचा टाहो ! महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात तलाठ्याने केले 'असे' काही...' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची महसूल विभागाने दखल घेत आपली चूक दुरुस्त केली आहे.

त्यामुळे शेवगावचे महसूल प्रशासन जागे झाले आणि त्यांनी तात्काळ त्या शेतकऱ्याचे नाव पूर्ववत उताऱ्यावर घेण्यासाठीची कार्यवाही केली आहे. संबंधित शेतकऱ्याने आपल्याला त्वरित न्याय मिळवून दिल्याबद्दल 'MBP Live24'चे आभार मानले आहेत. 

पीडित शेतकरी कारभारी सीताराम मडके यांनी ८ मार्च रोजी तक्रार अर्जाद्वारे आपली व्यथा प्रशासन आणि सरकार दरबारी मांडली होती. मात्र आपली कोणीही दखल घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी आपली कैफियत 'MBP LIVE 24' कडे मांडली. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत 'MBP Live 24' वृत्त प्रसिद्ध करून शेतकऱ्याची व्यथा जगासमोर मांडली. 

या वृत्ताची शेवगाव महसूल प्रशासनाने दखल घेत तहसीलदार कार्यालयाने संबंधित शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यानंतर पीडित शेतकऱ्याला चापडगाव येथील तलाठी के. यु. पवार यांनी मंगळवारी (ता. १६ मार्च ) मडके यांना कार्यालयात बोलावून त्यांच्या पत्नीचे सावित्रा कारभारी मडके यांचे उताऱ्यावरील नाव उर्ववत करण्याची कार्यवाही केली. त्यासाठी फेरफार नोंद अर्ज कार्यान्वित केला आहे. 

काय होती तक्रार...

पीडित शेतकरी कारभारी मडके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मी मौजे चापडगाव येथील गट नं. ५५३ / १ या जमिनीचे ९९ वर्षाचा साठेखत वर करारनामा संबंधितान कडून करून घेतला होता. त्या अनुषंगाने अनेक वर्षांपासून वरील गट नं. मधील ७ / १२ उताऱ्यावर माझ्या पत्नीचे नाव लावलेले होते. 

दरम्यान नुकतेच २ जून २०२० रोजी मी या जागेचा काढलेल्या उताऱ्यावर माझ्या पत्नी सावित्रा कारभारी मडके यांचे नाव स्पष्टपणे आपले होते. त्यानंतर २ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन उतारा काढला असता पत्नीचे नाव इतर हक्कात गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गेल्या आठवड्यात ९ मार्च रोजी काढलेल्या उतार्यात नाव थेट वगळून टाकल्याचे आढळल्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 

अन्यायग्रस्तांसाठी 'MBP Live 24' हे हक्काचे व्यासपीठ !

उताऱ्यावरून अचानक नाव वगळल्याची तक्रार महसूल प्रशासन आणि सरकार दरबारी केली होती. मात्र, त्याची कोणीही दखल घेत होतो. शासकीय कार्यालयाच्या चक्र मार्ट होतो. मात्र कोणी साधे ऐकूनही घेत नव्हते. त्यामुळे आता आपले नाव पुन्हा उताऱ्यावर येईल का?

त्यासाठी कितीवेळ लागेल असे प्रश्न मला पडले होते. काबाड कष्ट आणि आयुष्याची जमापुंजी एकत्र करून बांधलेले घर, जागा हातातून जाते काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, अशा वेळी 'MBP Live24'शी संपर्क केला आणि त्यांनी मोठा धीर दिला.

माझी कैफियत बातमी स्वरूपात मांडली आणि प्रशासन हालले. मला न्याय मिळाला. त्यामुळे 'MBP LIVE 24' चा आभारी आहे. अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ आहे. याचा मी साक्षीदार आहे. - कारभारी मडके, पीडित शेतकरी, चपडगाव.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !