सांगली - राज्यातील महाविकास आघाडी सरकार जावून आमचे सरकार यावे, अशी आमची इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. सांगलीत एका कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते.
आठवले म्हणाले, मुंबईत अंबानींच्या घराजवळ एक संशयास्पद स्कार्पिओ गाडी सापडली. त्या गाडीमालकाची काही दिवसांत हत्या झाली. राज्यातील काही भागात दलितांवर अत्याचार होत आहेत. राज्यात कायदा सुव्यसस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.
याबद्दल राज्यसरकारने कठोर पावले उचलावीत.राज्यातील परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर गेली आहे. अनेक पातळीवर सरकार अडचणीत सापडले आहे. या मुद्यांना समोर ठेऊन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सरकारला घेरूत असून सरकार पडण्याची व्युव्ह रचना आखत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
मराठा आरक्षणाबद्दल ते म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. सध्या हा विषय सुप्रीम कोर्टात आहे. हा कोर्टाचा निकाल पॉझिटिव्ह येईल, याचा मला विश्वास आहे. मराठा समाजाबरोबर जाट, पटेल अशा क्षत्रिय समाजातील लोकांनासुद्धा आरक्षणाचा लाभ देण्यात यावा असे ते म्हणाले.